आत्महत्या

 आत्महत्या
का हा शब्द कानावर पडला की अंगावर शहारे येतात आणि लगेचच तोंडातुन शब्द निघतात
कोणी केली आत्महत्या? आणि का?
असे अनेक प्रश्न या एका शब्दाने  उद्भवतात
याला आपण अनैसर्गिक मृत्यू म्हणू शोकतो.
मला हा प्रश्न पडलाय लोक आत्महत्या का करतात मी याचा विचार केला
कारणे खूप असतात
शिक्षण , व्यवसाय ,  शेती , प्रेम , लग्न , प्रोपर्टी , असे अनेक कारणे
तरी पण मला कळेना की लोक आत्महत्या या टोकाचा निर्णय कसे घेऊ शकतात
या सर्व करणांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे जीवनात हरतात त्यांना अपयश येतं
ते तणाव खाली जातात आणि ते स्वतःला कमजोर समजतात

"अपयश" आणी "तणाव" सहन करण्याची टाकत ज्यांच्या मध्ये असते त्यांना यश हे मिळतच.

मला त्या शेकताऱ्या ला सांगायचं आहे
निसर्गाला आपण नाही बदलू शकत
हे माहिती असताना मग स्वतःचा अनैसर्गिक मृत्यू कशाला करायचा.
ज्या आई ने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं त्रास सहन केला
त्या त्रासाचा पुढे तुमचा त्रास काहीच नाही
त्यामुळे आत्महत्या हा विचार मनात आला तर त्या आई चा विचार नक्की करा
काही व्यक्ती हे ही बोलतील की आईच नाही तर कस जगायचं तर त्या आई जन्म दिला तो आत्महत्या करण्यासाठी नाही हा विचार नक्की मनात ठेवा.

शिक्षण ,  व्यवसाय अशा अनेक गोष्टीत जिंकणे / हारने चालूच राहणार
हे नाण्याच्या दोन बाजू
तुम्ही हारलेत तर पुन्हा उभं राहायचं पुन्हा लढायचं पुन्हा हरलो तरी पुन्हा उभं राहायचं आणि लढायचं यश एक ना एक दिवस तरी तुमच्या वाट्याला येईलच.

स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण वादाळामध्ये मोठं-मोठे वृक्ष उमळून पडतात पण त्याच वादळात गवात मात्र टिकून राहते.
सकारत्मक विचार करा आयुष खूप सुंदर आहे
जेव्हा ही तुम्हाला वाटले दुःख खूप आहे अपयश आपला पाठलाग सोडत नाही  समजून जा सुख अथवा यश लवकरचं तुम्हाला मिडणार आहे

काही प्रेमी म्हणतील तीने / त्याने breakup केलं अथवा तीच /त्याच लग्न झालं त्यामुळे तिचा/त्याच्या शिवाय जगावं नाही वाटत
मला त्यांना एक सांगायचं आहे ती/तो तुमच्या आयुष्यात येण्या अगोदर तुम्ही जगतच होता ना?
म आता का आत्महत्या चा विचार करता
एखाद्या गोष्टीला तुम्ही 21 दिवस सतत करत गेले अथवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही 21 दिवस तुम्ही रोज संपर्कात राहिले तर ते व्यक्ती ही तुम्हाला आपलीशी वाटते
‌तर प्रेम फक्त आणि फक्त स्वतःवर करा आणि जीव देणं आहे तर देशा साठी द्या

आत्महत्या हा नकारात्मक विचार कधीच मनात येऊ देऊ नका
विचार बदलण्याचा एक छोटसं प्रेयत्न 

Comments